नवी दिल्ली – रेल्वे मंत्रालयाने सोमवारी घेतलेल्या एका नव्या निर्णयानुसार भारतीय रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) नाव बदलण्यात आले असून आरपीएफला संघटित गट ‘अ’ दर्जा बहाल करण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता भारतीय रेल्वे सुरक्षा दलाला, “भारतीय रेल्वे सुरक्षा दल सेवा” या नव्या नावाने ओळखले जाणार आहे.
याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशामध्ये, “माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयानंतर आरपीएफला संघटित गट ‘अ’ चा दर्जा देण्यात येत असून आता आरपीएफला रेल्वे सुरक्षा दल सेवा या नव्या नावाने ओळखले जाईल.
रेल्वे सुरक्षा दलाची स्थापना रेल्वे सुरक्षा दल अधिनियम १९५७ अनुसार करण्यात आली असून रेल्वेच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर सोपविण्यात आली आहे.