ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आत्मविश्‍वास वाढवणारी ठरेल – मनप्रीत सिंग

नवी दिल्ली – पुढील महिण्यात भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलिया येथे पाच सामन्यंच्या हॉकी मालिकेसाठी जाणार असून या बाद बोलताना भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग म्हणाला की, ऑस्ट्रेलियासारख्या जगज्जेत्या संघाविरुद्ध खेळल्यास युवा खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यातही मदत होईल. त्यामुळे ही मालिका आमच्यासाठी महत्वपूर्ण मालिका असणार आहे.

पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी झुंजणार आहे. त्यातील दोन सामने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध, दोन सामने अ संघाविरुद्ध आणि एक सामना पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील थंडरस्टिक्‍स क्‍लबविरुद्ध खेळणार आहेत.

पुढील महिन्यात भुवनेश्वरला होणाऱ्या वर्ल्ड हॉकी सीरिज स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हॉकीपटूंसाठी ही चांगली पूर्वतयारी ठरणार आहे. तर, भारतीय हॉकी संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्यासाठी हे पहिलेच आव्हान ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.