नवी दिल्ली – देशातील प्राणघातक करोना विषाणूच्या साथीचा वेग अनियंत्रित होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 1 लाख 17 हजार 100 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी 302 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनची 3 हजार 7 प्रकरणे समोर आली आहेत.
India reports 1,17,100 fresh COVID cases, 30,836 recoveries, and 302 deaths in the last 24 hours
Daily positivity rate: 7.74%
Active cases: 3,71,363
Total recoveries: 3,43,71,845
Death toll: 4,83,178Total vaccination: 149.66 crore doses pic.twitter.com/5uqB5lmnMj
— ANI (@ANI) January 7, 2022
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन मिळालेल्या रुग्णांबरोबर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 71 हजार 63 झाली आहे. त्याचबरोबर करोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 83 हजार 178 वर पोहचली आहे. देशभरात 30 हजार 836 लोक बरे झाले. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 लोक करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात करोनाचे 3 कोटी 52 लाख 26 हजार 386 रुग्ण आढळले आहेत.