सलग दहाव्या मालिका विजयासाठी भारत सज्ज

Chennai: Indian player Rohit Sharma bats in the nets during a practice session ahead of the first One Day International (ODI) cricket match against West Indies at MAC Stadium in Chennai, Friday, Dec. 13, 2019. (PTI Photo/R Senthil Kumar) (PTI12_13_2019_000186B)

वेस्ट इंडीजविरुद्ध चेन्नईत पहिला सामना आज

चेन्नई: तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना सलग दहाव्या द्विपक्षीय मालिका विजयाच्या दिशेने भारत प्रयत्न करेल. तर बलाढ्य भारताचे आव्हान परतवून लावण्यासाठी कॅरेबियन्सही कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसानंतर दोन्ही संघांच्या तंबूमध्ये चिंतेचे वातावरणही दिसून येत आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार आणि सय्यद मुश्‍ताक अली करंडक स्पर्धेदरम्यान दुखापतीतून सावरलेल्या शिखर धवन या सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मुंबईचा शार्दुल ठाकूर जखमी भुवनेश्‍वरची जागा घेणार आहे. धवनच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी बजावली असल्याने सध्या तरी सलामीची चिंता भारताला नाही. मुंबईत फलंदाजांच्या शानदार कामगिरीने टी-20 मालिका जिंकल्यानंतर विराट कोहलीचे “मेन इन ब्लू’ जबरदस्त फॉर्मात आहेत.

धवनच्या जागी मयंक आग्रवालची झालेली निवड सार्थ आहे की नाही ते पाहणे रंजक ठरणार आहे. कर्नाटकचा हा फलंदाज कसोटी सामन्यात अव्वल फॉर्ममध्ये आहे आणि त्याने दिंडीगुलमध्ये तामिळनाडूविरुद्धच्या रणजी सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याने राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवला आहे. श्रेयस अय्यरने मिळालेल्या संधींचे सोने केले आहे. माजी कर्णधार अनिल कुंबळेनेही वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईच्या फलंदाजाची बाजू घेतली आहे.

आता यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिला एकदिवसीय सामना त्याच्यासाठी कोहली आणि संघ व्यवस्थापनाने दर्शविलेल्या विश्‍वासाचे औचित्य सिद्ध करण्याची आणखी एक संधी
ठरु शकेल. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची फिरकी जोडी पुन्हा परिणामकारक ठरेल का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. चेपाकच्या मैदानावर मदगती गोलंदाजांना चांगली साथ मिळते. तर अनुभवी मोहम्मद शमी आणि दीपक चहर कदाचित वेगवान आक्रमण करतील.

मुंबईत टी-20 मध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झालेला फलंदाज इव्हिन लुईस उद्याच्या सामन्यात भाग घेऊ शकेल अशी अपेक्षा आहे. शिमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहेच. तशाच कामगिरीची 50 षटकांच्या सामन्यात त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात येत आहे. अष्टपैलू रोस्टन चेसच्या इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. कर्णधार कीरॉन पोलार्डला आघाडीवर रहात सर्वोत्तम कामगिरीचा आदर्श घालून देत नेतृत्व करावे लागेल.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल यांना रोखण्याचे आव्हान शेल्डन कोटरेल आणि जेसन होडरवर असेल. लेगस्पिनर हेडन वॉल्श ज्युनियरने टी-20 मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्याला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.

असे असतील दोन्ही संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.
वेस्ट इंडीज : किरोन पोलार्ड (कर्णधार), सुनील अंब्रिस, शाई होप, खॅरी पियरे, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कोटरेल, ब्रॅंडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, इव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर , कीमो पॉल, हेडन वॉल्श जूनियर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)