India Open 2024 Final, Satwik-Chirag finish runners-up : सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीला BWF 750 इंडियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत विश्वविजेत्या कोरियन जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. सात्विक-चिराग जोडीला 65 मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात 21-15, 11-21, 18-21 असा पराभव स्विकारावा लागला. यासह कांग मिन ह्युक आणि सियो सेयुंग जेइ यांनी भारतीय जोडीविरुद्धची तीन पराभवांची मालिका संपुष्टात आणली.
“सात्विक-चिराग यांचा यापूर्वी मलेशिया ओपन 2024 च्या अंतिम फेरीतही पराभव झाला होता. सात्विक-चिरागचे इंडिया ओपनचे विजेतेपद दुसऱ्यांदा जिंकण्याचे स्वप्न भंगले. या भारतीय जोडीने 2022 साली इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावले होते. इंडिया ओपनच्या पुरुष दुहेरी स्पर्धेत सात्विक-चिराग व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय जोडीला आजपर्यंत विजेतेपद मिळवता आलेले नाही.”
Congratulations Kang/Seo 👏
Well played SatChi, onwards and upwards!#YonexSunriseIndiaOpen2024 #IndiaKaSmashMania#BWFWorldTourSuper750#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/fs3vJRRj8B
— BAI Media (@BAI_Media) January 21, 2024
पहिल्या गेमच्या सुरुवातीला कोरियन खेळाडूंनी भारतीय जोडीच्या अंगावर मारा करायला सुरुवात केली. चिरागनेही काही चांगले लाइन जजमेंट दाखवले. पहिल्या गेमच्या ब्रेकपर्यंत भारतीय जोडीने 11-9 अशी आघाडी मिळवली होती. ब्रेकनंतर भारतीय जोडी अधिक आक्रमक दिसली आणि कोरियन जोडीला पुनरागमनाची संधी दिली नाही. सात्विक-चिरागने हा गेम 21-15 असा जिंकला.
सात्विक-चिरागने अंतिम सामन्यात दमदार सुरुवात करत पहिला गेम जिंकला. यानंतर कोरियन जोडीने जोरदार पुनरागमन करत दुसरा गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडी अजिबात लयीत दिसली नाही. दुसऱ्या गेममध्ये कोरियन जोडीने आधीच वरचढ असल्याचे दिसून आले आणि अवघ्या 17 मिनिटांत 21-11 असा विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिरागने चिया आणि सोह वुई या चौथ्या मानांकित जोडीचा पराभव 45 मिनिटांत 21-18, 21-14 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे, कांग आणि सियो या तिसर्या मानांकित जोडीने उपांत्य फेरीत होकी ताकुरो आणि युगो कोबायाशी या सातव्या मानांकित जपानी जोडीचा 21-19, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता.
तिसऱ्या गेमच्या सुरुवातीच्या हाफमध्येही परिस्थिती तशीच होती. तिसऱ्या गेममध्ये मध्यंतराला सात्विक-चिराग 6-11 ने पिछाडीवर होते. येथून भारतीय जोडीने दमदार पुनरागमन करत कोरियन जोडीची आघाडी एका गुणाने कमी केली. 18-19 अशा स्कोअरसह कोरियन जोडीने दोन गुण घेत सामना जिंकला.