नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्यासाठी 11 ते 13 ऑक्टोबर पर्यंत प्रथम “इंडिया आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापार मेळा’ नवी दिल्लीतल्या प्रगती मैदान येथे होणार आहे. देश-परदेशात सहकारी ते सहकार व्यापार वाढवणे, कृषी वस्तू व उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी या व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कृषी व्यापार मेळाव्यातून भारत आणि परदेशातील उद्योग आणि व्यवसायिकांना विविध उत्पादने आणि सेवादात्यांशी संवाद साधून, संयुक्त, व्यवसाय नेटवर्किंग, उत्पादन सोर्सिंग आणि त्याहूनही महत्त्वाची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या व्यापार मेळ्यामध्ये भाग घेण्यासाठी सहा खंडातील 35 देशांनी सहभाग निश्चित केला आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बेल्जियम, भूतान, ब्राझील, चीन, कोलंबिया, फिजी, जर्मनी, इराण, इस्त्राईल, जपान, जॉर्डन, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, नायजेरिया, फिलिपिन्स, रशिया, स्पेन, श्रीलंका, सेनेगल, थायलंड, टांझानिया, अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती आणि व्हिएतनाममधील कृषीविषयक उत्पादने या व्यापार मेळ्यामध्ये सादर केली जाणार आहेत.