नवी दिल्ली – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. कोरोना विषाणूचा सामना करताना जगातील बलशाली देश देखील मेटाकुटीला आले असून या जीवघेण्या संकटातून स्वतःला सावरण्यासाठी धडपड करत आहेत. कोरोना विषाणूवर अद्याप कोणताही उपचार अथवा प्रतिबंधात्मक लस सापडली नसली तरी कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध परिणामकारक ठरताना दिसत आहे. भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा मुबलक साठा असून या संकटसमयी भारताने औदार्य दाखवत जगभरातील १३ देशांना १ कोटी ४० लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचे वाटप केले आहे.
भारतातर्फे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्या देण्यात आलेल्या देशांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये यूएसए, स्पेन, जर्मनी, बहरीन, ब्राझील, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव, बांगलादेश, सेशेल्स, मॉरिशस आणि डोमिनिकन रिपब्लिक या देशांचा समावेश आहे.