सातारा (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील १३ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कोल्हापूर येथील करोना बाधित महिलेच्या निकट सहवासातील १३ जण फलटण तालुक्यातील क्वारंटाइन फॅसिलिटी केंद्रामध्ये दाखल होते. या १३ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली.