नवी दिल्ली – जगभरात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. अमेरिकेत तर करोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनेक देशांमध्ये विविध औषधांचा वापर करण्यात येत होता. मात्र आता यापैकी काही औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने नवीन इशारा दिला आहे.
करोनाचे उपचार करण्यासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर करण्यात येत आहे. करोनाच्या महामारीत सुरुवातीच्या काळात या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही करोनाच्या महामारीत हे औषध ‘गेम चेंजर’ ठरत असल्याचे सांगितले होते. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने या औषधापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
The anti-inflammatory drug hydroxychloroquine should NOT be used to prevent infection in people who do not have #COVID19, according to the latest WHO clinical care guidance https://t.co/Oi2NJQMwiZ pic.twitter.com/0UQr78hNk4
— World Health Organization (WHO) (@WHO) March 2, 2021
जागतिक आरोग्य संघटनेच्या ट्विटर हँडलवर या औषधासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित रुग्णांवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. तसेच या औषधांमुळे रुग्णालयात भरती होणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेलं नाही. उलट या औषधाचा विपरीत परिणाम रुग्णांवर होण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.