संयुक्तराष्ट्रे- अमेरिका आणि चीन यांच्यात कर आकारणीवरून गेले काही दिवस जो वाद सुरू आहे त्यातून भारताचा लाभ होंताना दिसून येत असून भारताने गेल्या सहा महिन्यात अमेरिकेला 755 दशलक्ष डॉलर्सचा जादा माल निर्यात केला आहे. अशी माहिती एका व्यापार विषयक अहवालात देण्यात आली आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील आयात-निर्यात सध्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा लाभ उठवत भारताने रसायने, धातु, खनिज पदार्थ याची अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात केली आहे. चालू कॅलेंडर वर्षातील पहिल्या सहा महिन्यातील भारताच्या निर्यातीची ही वाढ आहे.
अमेरिकेचे चीनशी सध्या जे विविध विषयांवरून भांडण सुरू आहे त्याचा लाभ तैवान, मेक्सिको, आणि युरोपियन युनियन मधील काही देशही उठवताना दिसत आहेत. भारताकडून अमेरिकेला जो माल निर्यात होतो त्यात वरील वस्तुंखेरीज इलेक्ट्रीक मशीनरी, कृषी उत्पादने, फर्निचर, ऑफिस मशिनरी, कापड, ट्रान्स्पोर्ट इक्वीपमेंट्स इत्यादी वस्तुंचाही समावेश आहे.