नवी दिल्ली – यावर्षी 30 मार्च ते 3 एपिल या कालावधीत अरबी समुद्रात भारतीय आणि फ्रेंच नौदलाचा “वरुण-2022′ द्वैवार्षिक संयुक्त युद्ध सराव सुरू झाला.
दोन्ही नौदलांच्या द्वैवार्षिक संयुक्त युध्द सरावाची सुरुवात 1993 मध्ये करण्यात आली. वर्ष 2001 मध्ये या सरावाला वरुण असे नाव देण्यात आले. दोन्ही देशांची जहाजे, पाणबुड्या, सागरी गस्त घालणारी विमाने, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यासह अनेक विभाग या सरावामध्ये सहभागी होतील.
वरुण सराव मालिकेने दोन्ही देशांच्या नौदलांना परस्परांच्या सर्वोत्कृष्ट पद्धती शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हा सराव दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान परिचालनविषयक पातळीवर चर्चा होण्यासाठीचा मुख्य प्रेरणास्रोत ठरला आहे तसेच या सरावाने जागतिक सागरी क्षेत्रामध्ये संरक्षण, सुरक्षितता आणि खुल्या वातावरणाप्रति दोन्ही देशांची सामायिक प्रतिबद्धता अधोरखित केली आहे.