#AUSAvINDA : ऑस्ट्रेलिया “अ’ संघाकडे महत्त्वपूर्ण आघाडी

भारत "अ' पहिला डाव 9 बाद 247 घोषित

सिडनी – भारत “अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या तीन दिवसीय सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर 39 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. सोमवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या “अ’ संघाने आपल्या पहिल्या डावात 8 बाद 286 धावा केल्या होत्या. त्यापूर्वी भारत “अ’ संघाने आपला पहिला डाव 9 बाद 247 धावांवर घोषित केला होता. 

कालच्या 8 बाद 237 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यानंतर कर्णधार अजिंक्‍य रहाणेने आपल्या कालच्या धावसंख्येत 9 धावांची भार घातली. तो बाद झाल्यानंतर भारत “अ’ संघाने डाव घोषित केला.

ऑस्ट्रेलिया “अ’ संघाच्या पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली. त्यांचा निम्मा संघ 98 धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर मात्र, मार्कस हॅरीस, निक मेडीन्सन, टीम पेनी व मायकेल नेसर यांना साथीला घेत कॅमेरून ग्रीनने संघाचा डाव सावरला. त्याने नाबाद शतकी खेळी करताना संघाला भारत “अ’ संघाविरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ग्रीन 114 धावांवर तर मायकेल स्टेकेटी 1 धावेवर नाबाद राहिले. ग्रीनने आपल्या शतकी खेळीत 173 चेंडूत 10 चौकार व 1 षटकार फटकावला.

संक्षिप्त धावफलक

भारत अ पहिला डाव – 93 षटकांत 9 बाद 247 घोषित. (चेतेश्‍वर पुजारा 54, उमेश यादव 24, अजिंक्‍य रहाणे नाबाद 108, जेम्स पॅटिन्सन 3-58, ट्रेविस हेड 2-24, मिचेल नेसर 2-51). ऑस्ट्रेलिया अ पहिला डाव – 85 षटकांत 8 बाद 286 धावा. (टीम पेनी 44, मार्कस हॅरीस 35, मायकेल नेसर 33, निक मेडीन्सन 23, उमेश यादव 3-44, रवीचंद्रन अश्‍विन 2-58, महंमद सिराज 2-71).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.