खेड – तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरूनगर शहरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी ध्वजारोहण झाले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
खेड तहसीलदार कर्यालयात शासकीय ध्वजारोहन खेडचे प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकारी, राजगुरूनगर शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दुसरीकडे महात्मा गांधी विद्यालयात खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी सुमारे २ हजार विद्यार्थी, त्यांचे पालक, संस्थेचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, खेड तालुक्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शालेय गणवेश, बुट आदी चे वाटप करण्यात आले. अनेक गावातील शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले असून ‘माझी माती माझा देश’ व ‘हर घर तिरंगा’ याही उपक्रमांना तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला.