India vs South Africa : भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सध्या ३ सामान्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज गुवाहाटी येथील बार्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. या सामन्यात भारतीय संघाने उकृष्ट गोलंदाजी केली होती. त्यामुळे तो सामना भारतीय संघाने ८ गडी राखून जिंकला होता. आज खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ त्यांचे या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतणार आहे.
महत्वाचे म्हणजे आजच्या सामन्यावेळी ( India vs South Africa ) गुवाहाटी येथील हवामान आणि खेळपट्टी कशी असणार आहे. खेळपट्टी गोलंदाजीला साथ देईल की फलंदाजीला याबाबत माहिती पाहणार आहोत. गुवाहाटी येथील या मैदानावर याअगोदर जानेवारी २०२२ ला शेवटचा सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र तो सामना पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला होता. या ठिकाणचे दिवसाचे तापमान थोडे उष्ण असते मात्र आजचा सामना रात्री खेळला जाणार आहे. त्यामुळे येथे उष्णतेबाबत कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.
गुवाहाटी येथील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास सामन्याच्या दिवशी म्हणजे आज पाऊस पडण्याची थोडी शक्यता आहे. या ठिकाणी दिवसा तापमान ३५ अंश सेल्सिअस तर रात्री २५ अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. दिवसभर ४१ टक्के आणि रात्री पावसाची ८० टक्के शक्यता वर्तवली जात आहे. ( IND vs SA T20 Barasapara Cricket Stedium Pitch Report and Guvahati Weather Update )
या मैदानावर झालेल्या सामन्यांच्या आकडेवारीवरून येथे फारशा धावा झालेल्या नाहीत असे समजते. गेल्या वेळी या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना झाला होता, तेव्हा भारतीय संघ केवळ १२२ धावा करून ऑलआऊट झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फने ४ बळी घेतले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला होता. खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर मागील सामन्याप्रमाणे येथेही नवीन चेंडू गोलंदाजांना मदत करू शकतो. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीच्या काही षटकांमध्ये सावधपणे खेळावे लागणार आहे.