IPL 2024 (SRH vs CSK Match 18) : आयपीएल 2024 मध्ये 18 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आज (शुक्रवार, 5 एप्रिल) आमनेसामने येणार आहेत. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार असून संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्याआधी 7.00 वाजता टाॅस होईल.
या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत घातक कामगिरी केली आहे. या लेखात जाणून घ्या की, IPL इतिहासात CSK विरूध्द SRH यांच्यात कोणाचे वर्चस्व राहिलेलं आहे.
आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादने 3 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे, तर 2 गमावले आहेत. यासह ते 2 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. तर, CSK ने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 1 सामना गमावला आहे. यामुळे ऋतुराजचा संघ 4 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमधील हा सामना चुरशीचा होऊ शकतो. SRH साठी आयपीएल स्पर्धा आतापर्यंत चढ-उतार झाली आहे, तर CSK मजबूत स्थितीत आहे.
SRH vs CSK Head to Head Records…
सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये एकूण 19 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत CSK ने 14 सामने जिंकले आहेत, तर SRH ने फक्त 5 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये, CSK ची सर्वोत्तम धावसंख्या 223 धावा आहे, तर SRH ने सर्वाधिक 192 धावा केल्या आहेत.
खेळपट्टी अहवाल (Pitch Report)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. याच खेळपट्टीवर एचआरएचने एमआयसमोर 277 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र, गेल्या मोसमात येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 174 होती. येथे आयपीएल 2023 मध्ये, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने चार सामने जिंकले, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला.
राजीव गांधी स्टेडियम IPL रेकॉर्ड…
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत 72 सामने खेळले गेले आहेत. टक्केवारीच्या बाबतीत बोलायचे झाले तर यातील 55.56% सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर त्यातील 44.44% सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
SRH विरुद्ध CSK सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?
सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.