पुणे – भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरी कसोटी सध्या गहुंजे मैदानावर सुरू आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. भारताने पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत भारतीय गोलंदांनी आफ्रिकेची अवस्था बिकट केली आहे. आता सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 181 धावांवर खेळत असून त्यांनी 8 गडी गमावले आहेत.
2nd Test. 67.1: U Yadav to K Maharaj (9), 4 runs, 181/8 https://t.co/IMXND6IOWv #IndvSA @Paytm
— BCCI (@BCCI) October 12, 2019
दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रातच भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेची सळो की पळो करून सोडले होते. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी आफ्रिकेची चांगलीच दाणादाण केली होती आणि आता तिसऱ्या दिवशीही आफ्रिकेची सुरुवात खराबच झाली. मोहम्मद शमीने नॉर्ट्जेला माघारी धाडत आफ्रिकेला धक्का दिला. यानंतर डी-ब्रून आणि क्विंटन डी-कॉकही ठराविक अंतराने माघारी परतले.
Lunch on Day 3 of the 2nd Test. #TeamIndia bowlers pick three wickets in the 1st session.
South Africa 136/6, trail India 601/5d by 465 runs. pic.twitter.com/gN5SIi8C1b
— BCCI (@BCCI) October 12, 2019
दुसऱ्या बाजूने कर्णधार फाफ डु-प्लेसिसने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत एक बाजू लावून धरली, मात्र तोही अश्विनच्या गोलंदाजीवर 64 धावांवर बाद झाला. सध्या वनॉन फिलॅंन्डर 20 धावांवर आणि केशव महाराज 10 धावांवर खेळत आहेत.
WICKET! There we go! Just what #TeamIndia needed.
South Africa 162/8 https://t.co/IMXND6rdxV #INDvSA pic.twitter.com/rEznG0k0TA
— BCCI (@BCCI) October 12, 2019