World Cup 1st Semi Final 2023 Ind vs Nz live Score: भारतानं विजयासाठी समोर ठेवलेल्या 398 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या 41 षटकांनंतर 4 बाद 286 धावा झालेल्या आहेत. ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही वेगाने धावा काढत आहेत आणि किवी संघ सामन्यात कायम आहे.
डेरिल मिशेल शतक झळकावल्यानंतर खेळत आहे. दुसऱ्या टोकाला ग्लेन फिलिप्स चांगली फलंदाजी करत आहे. या दोघांनी पुन्हा एकदा डाव सांभाळला आहे.दोघांची भागीदारी भारतासाठी अत्यंत धोकादायक असून भारतीय गोलंदाजांना ती लवकरात लवकर मोडावी लागेल.
त्याआधी, मोहम्मद शमीने 220 धावांवार एका षटकात दोन विकेट घेत सामन्याचे चित्र फिरवले. विल्यमसननंतर त्याने लॅथमला पॅव्हेलियनमध्ये पाठवत किवी संघाला चौथा धक्का दिला.लॅथमने दोन चेंडूंचा सामना केला. त्याला खातेही उघडता आले नाही.न्यूझीलंडची तिसरी विकेट 220 धावांवर पडली. केन विल्यमसन 73 चेंडूत 69 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.
त्याआधी, न्यूझीलंड संघाची सुरूवात खराब झाली. त्यांचे रचिन रवींद्र आणि डेवोन कॉन्वे हे दोन्हीही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. न्यूझीलंडची दुसरी विकेट 39 धावांवर पडली.मोहम्मद शमी डावातील आठवे षटक टाकायला आला. तिसऱ्या चेंडूवर रवींद्रने शमीविरुद्ध चांगला ड्राईव्ह मारला आणि चौकार मारला. पुढच्याच चेंडूवर शमीने आपला बदला पूर्ण केला आणि रचिन रवींद्रला यष्टिरक्षक राहुलकडे झेलबाद केले. रचिन रवींद्रने 22 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या.
पॉवरप्लेनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 46 अशी होती. त्याआधी,न्यूझीलंडची पहिली विकेट 30 धावांवर पडली. मोहम्मद शमीने डेव्हन कॉनवेला बाद केले. त्याने 15 चेंडूत 13 धावा केल्या. लोकेश राहुलने त्याचा झेल घेतला.
तत्पूर्वी, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकामुळे भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनीही संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 105 धावांची खेळी केली. भारतीय कर्णधार रोहितने 29 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. या काळात हिटमॅनचा स्ट्राइक रेट 162.07 होता.कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली. अय्यरने 70 चेंडूत 150 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. अय्यरच्या खेळीत 4 चौकार आणि 8 लांब आणि नेत्रदीपक षटकारांचा समावेश होता.
यानंतर सूर्यकुमार यादव 50 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धावा काढून बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेला केएल राहुल आणि सलामीला आलेला शुभमन गिल नाबाद माघारी परतले. गिलने 66 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 20 चेंडूत 195 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज टिम सौदीने 10 षटकांत सर्वाधिक 100 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय बोल्टने 10 षटकांत 86 धावा देत 1 बळी घेतला. तर मिचेल सँटनरने 10 षटकांत 51 धावा, फर्ग्युसनने 8 षटकांत 65 धावा, रचिनने 7 षटकांत 60 आणि फिलिपने 5 षटकांत 33 धावा दिल्या.