IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले आणि अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले.
या सामन्याच्या पहिल्या डावात जैस्वालने 209 धावा केल्या. घरच्या भूमीवर त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय द्विशतक आहे. यासह हा युवा फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. यासह सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी यांच्या क्लबमध्ये सामील झाला. भारतासाठी कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पाचवा डावखुरा सलामीवीर ठरला. यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या 10व्या डावात द्विशतक झळकावले आणि करुण नायर-विनोद कांबळी यांच्या क्लबमध्ये देखील सामील झाला.
1. जैस्वाल कसोटीत द्विशतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला…
यशस्वी जैस्वाल हा 200 धावा करणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या 22 वर्षे 37 दिवसात त्याने ही कामगिरी केली आहे. या यादीत विनोद कांबळी पहिल्या दोन क्रमांकावर आहे. तर सुनील गावस्कर 283 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विनोद कांबळी : (वय 21, धावा 224), Vs इंग्लंड, मुंबई 1993
विनोद कांबळी : (वय 21, धावा 227), Vs झिम्वाब्वे, दिल्ली 1993
सुनील गावस्कर : (वय 21, धावा 220), Vs वेस्ट इंडीज, पोर्ट ऑफ स्पेन 1971
यशस्वी जैस्वाल : (वय 22, धावा 209), Vs इंग्लंड, विखाखापट्ट्णम 2024
2. कसोटीत 200 धावा करणारा पाचवा डावखुरा फलंदाज
भारतासाठी पाचवा कसोटी सामना खेळणाऱ्या जयस्वालने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या बॅटच्या गडगडाटाने विक्रमांची मालिका रचली. त्याने भारताची धावसंख्या 396 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या शानदार कामगिरीच्या जोरावर जैस्वाल 200 धावा करणारा पाचवा डावखुरा भारतीय फलंदाज ठरला. सौरव गांगुलीने हा पराक्रम पहिल्यांदा केला. त्याने 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 239 धावा केल्या होत्या. यानंतर विनोद कांबळी आणि गौतम गंभीरने ही कामगिरी केली.
सौरव गांगुली : धावा 239 Vs पाकिस्तान, बेंगळुरू 2007
विनोद कांबळी : धावा 227 Vs झिम्बाब्वे, दिल्ली 1993
विनोद कांबळी : धावा 224 Vs इंग्लंड, मुंबई 1993
गौतम गंभीर : धावा 206 Vs ऑस्ट्रेलिया, दिल्ली 2008
यशस्वी जैस्वाल : धावा 209 Vs इंग्लंड, विशाखापट्टणम 2024
IND vs ENG 2nd Test Day 2 : यशस्वीचे शानदार द्विशतक; भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला…
3. दहाव्या डावातच झळकावले द्विशतक…
यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 10व्या डावात द्विशतक झळकावले. यासह तो करुण नायर आणि विनोद कांबळी यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. करुण नायरने कारकिर्दीतील तिसऱ्या डावात द्विशतक झळकावले होते. त्याचवेळी विनोद कांबळीने पहिले द्विशतक झळकावण्यासाठी चार डाव घेतले होते. सुनील गावसकर आणि मयंक अग्रवाल यांनी आठ डावात असे केले, तर पुजाराने नवव्या डावात पहिले द्विशतक झळकावले. या यादीत यशस्वी पाचव्या स्थानावर आहे.