IND vs ENG 2nd Test Day 2, Yashasvi Jaiswal Double Hundred : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शाखापट्टणम येथील वायएस राजशेखर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला. भारतासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने अप्रतिम फलंदाजी करत द्विशतक झळकावत 209 धावा केल्या. आपल्या 209 धावाच्या खेळीत यशस्वीने 290 चेंडूंचा सामना केला. या काळात त्याच्या बॅटमधून 19 चौकार आणि 7 षटकार आले.
Innings Break! #TeamIndia posted 396 runs on the board, with @ybj_19 scoring a mighty 209.
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/OVaIuHKbfE
— BCCI (@BCCI) February 3, 2024
भारतीय संघाच्या पहिल्या डावात स्टार युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच भारताची एक बाजू संभाळून धरली. यशस्वी जैस्वालला इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून फार काळ साथ मिळाली नाही, तरीही त्याने सर्व फलंदाजांसह छोट्या आणि महत्त्वाच्या भागीदारी केल्या. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. 34 धावा करणारा शुभमन गिल संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
भारताचे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले आणि आता या दोघांनाही संघातून वगळले जाऊ शकते. तिसऱ्या कसोटीसाठी संघनिवड अजून व्हायची आहे. विराट कोहली संघात परतला तर श्रेयस अय्यर टीम इंडियातून वगळले जाऊ शकते . त्याचवेळी राहुलही फिट झाल्यास शुभमन गिललाही संघातून बाहेर केले जाऊ शकते.
#PKLSeason10 (#DELvBEN Match 100) : महत्वपूर्ण लढतीत बंगालचा दिल्लीला पराभवाचा धक्का…
वयाच्या 41 व्या वर्षी अँडरसनने दाखवला उत्साह ..
इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात त्यांच्या बाजूने सर्वात यशस्वी आणि किफायतशीर गोलंदाज 41 वर्षीय जेम्स अँडरसन होता. त्याने आपला सर्व अनुभव भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजीत पणाला लावला. याचा पुरेपूर फायदा अँडरसनलाही झाला. या डावात त्याने 25 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 4 षटके निर्धाव टाकताना केवळ 47 धावा दिल्या. भारताच्या पहिल्या डावात अँडरसनने तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याने शुभमन गिल, आर अश्विन आणि यशस्वी जैस्वाल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याव्यतिरिक्त शोएब बशीर आणि रेहान अहमदने प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.