IND vs AUS 2nd T20, Team India Touchdown Trivandrum : भारतीय संघाने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला. त्याचवेळी, आता या मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे.
उद्या रविवारी (26 नोव्हेंबर) दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. भारतीय संघाचे फोटो अन् व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बीसीआयनं Touchdown Trivandrum असं म्हणत टीम इंडियाचा देखील व्हिडीओ शेअर केला आहे.
✈️ Touchdown Trivandrum!#TeamIndia are here for the 2⃣nd #INDvAUS T20I 👌👌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/dQT4scn38w
— BCCI (@BCCI) November 24, 2023
सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो विमानतळाचे आहेत. या फोटोत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दिसत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते सातत्याने कमेंट करून यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
Let the chenda roll! Touchdown Trivandrum! 🥁🇮🇳 pic.twitter.com/z2b5e2Pl29
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 25, 2023
टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर…
त्याचवेळी, याआधी भारतीय संघाने पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला होता. अशाप्रकारे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघासमोर 209 धावांचे लक्ष्य होते.
भारतीय संघाने 19.5 षटकात 8 विकेट गमावत 209 धावा करत सामना जिंकला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत सर्वाधिक 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय इशान किशनने 39 चेंडूत 58 धावा केल्या. तर रिंकू सिंगने शेवटच्या षटकांमध्ये 14 चेंडूत 22 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय जेसन बेहरेन्डॉफ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अॅबॉट यांना 1-1 असे यश मिळाले.