माउंट माउंगनुई : कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाचव्या व अखेरच्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
163 on the board. Can #TeamIndia defend the target? 🧐🧐 #NZvIND pic.twitter.com/GlS4lqIoJL
— BCCI (@BCCI) February 2, 2020
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर भारतीय संघाने २० षटकांत ३ बाद १६३ धावा केल्या. भारतीय संघाकडून रोहित शर्माने ४१ चेंडूत ( ३ चौकार व ३ षटकार) ६० तर लोकेश राहुलने ३३ चेंडूत (४ चौकार व २ षटकार) ४५ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. संजू सॅमसन २ तर शिवम दुबे ५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मनीष पांडेने ४ चेंडूत (१ चौकार व १ षटकार) नाबाद ११ आणि श्रेयस अय्यरने ३१ चेंडूत (१ चौकार व २ षटकार) नाबाद ३३ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १६३ पर्यंत नेली.
FIFTY!@ImRo45 brings up his 21st T20I half-century off 36 deliveries.
Live – https://t.co/3a7zBdRNm2 #NZvIND pic.twitter.com/N1nRDSvNjo
— BCCI (@BCCI) February 2, 2020
न्यूझीलंड संघाकडून स्काॅट कुग्गलिनने ४ षटकात २५ धावा देत २ तर हेमिश बेनेटने ४ षटकात २१ धावा देत १ गडी बाद केला.