पुणे – थंडी सुरू झाल्यामुळे मटण, चिकन, मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच दिवाळीत भाऊबीजमुळे मटण, चिकन, मासळीला चांगली मागणी होती. त्यामुळे पापलेट, कोळंबी, हलवा, रावसच्या भावात 10 ते 20 टक्के वाढ झाली.
बोकडांचा तुटवडा निर्माण झाल्याने मटणाच्या भावात किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने इंग्लिश अंड्यांच्या शेकडा भावात 35 रुपयांनी वाढ झाली असून पुरवठा सुरळीत असल्याने गावरान अंडी आणि चिकनचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि. 7) खोल समुद्रातील मासळीची 15 टन, खाडीची 100 ते 200 किलो, तर नदीच्या मासळीची एक टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची 15 ते 20 टन इतकी आवक झाली,
अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन, अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : 1400-1600 मोठे -1200-1400 मध्यम : 900-1000, लहान 700-800, भिला : 600-700, हलवा : 480-550, सुरमई : 360-650, रावस : लहान 480, मोठा : 750, घोळ : 550 करली : 240, पाला : 550-1200, वाम : पिवळी : 360-600, काळी :120-360, करंदी 120-160, ओले बोंबील : 120-160.
कोळंबी : लहान 180-280, मोठी-360-550, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1400-1500, मोरी : 240, खेकडे : 240-320 चिंबोऱ्या : 400-550, मांदेली-100-140, राणीमासा-160-200. खाडीची मासळी : सौंदाळे-200, खापी-200-240, नगली : 200-280, तांबोशी : 320-400, पालू- 200-280, बांगडा : लहान-160-200,
बांगडा मोठा- 200-240, शेवटे 240. तिसऱ्या: 240 , खुबे : 100-120, लेपा-160-240, शेवटे- 240, पेडवी-100, वेळुंजी-120-160, तारली- 160. नदीतील मासळी : रहू-120-160, कतला-120-160, मरळ-400-480, शिवडा-240, खवली-240, आम्ळी-160, खेकडे-200, वाम-480. मटण- बोकडाचे 700,
बोलाईचे 700, खिमा-700, कलेजी-740. चिकन 220, लेगपीस-270, जिवंत कोंबडी-160, बोनलेस-320. अंडी : गावरान शेकडा 920, डझन 120, प्रतिनगास 10. इंग्लिश अंडी- शेकडा 495, डझन 72, प्रतिनग 6.00.