बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे ही एक मॉडेल असून ती यूट्यूब चॅनलदेखील चालविते. अलाना पांडे आपला बॉयफ्रेंड इवॉर याच्यासोबत नुकताच साखरपुडा केला आहे. हे दोघेजण अनेक महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
अलाना आणि इवॉर यांनी फिल्मी अंदाजात आपला साखरपुडा साजरी केला आहे. अलानाने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला आहे. यात तिचा बॉयफ्रेंड तिला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे.
हा क्षण एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. अलानाने इंस्टाग्रामवर एक खास संदेश लिहिला की, मी जोपर्यंत तुला भेटली नव्हती, तोपर्यंत मी दुसऱ्या व्यक्तीवर इतके प्रेम करण्याची कल्पनाही करू शकत नव्हती. मला दररोज हसविल्याबद्दल आणि आनंदी ठेवल्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे.
वास्तविक, या जगात मला तुच सर्वात आनंदी ठेवू शकतोस. इवॉर, मी आता तुला माझा जीवनसाथी बनविण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही. दरम्यान, अलानाचा बॉयफ्रेंड इवॉर हा एक चित्रपट दिग्दर्शक आहे. अलाना पांडेने लंडन येथे फॅशन क्षेत्रातील शिक्षण घेतले असून तिने मॉडलिंग क्षेत्रातही काम केलेले आहे.