पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचा समावेश

नवी दिल्ली: पॅरिसमध्ये होणाऱ्या 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कबड्डीचा समावेश व्हावा यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी नमूद केले आहे.

भारताची लोकसंख्या हीच आपली ताकद आहे, त्यामुळे कबड्डीचा खेळ देशात लोकप्रिय होत आहे तर त्याची व्याप्ती जगभर पसरली पाहिजे आणि त्यासाठी या खेळाचा समावेश ऑलिंम्पिकमध्ये व्हावा यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

भारत आता सुपरपॉवर बनला आहे, त्यामुळे आपल्या विनंतीचा नक्कीच गांभीर्याने विचार केला जाईल, अशी अपेक्षा आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या खेळाचा समावेश करावा यासाठी जे काही करणे शक्‍य आहे, ते सर्व केले जाईल, तसेच त्यासाठी लॉबींग करावे लागले तर ते देखील करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.