पहिल्यांदाच आर्मी अधिकाऱ्याच्या रोलमध्ये वरुण धवन

वरुण धवन सध्या “कुली नं 1’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याचे शुटिंग बॅंकॉकमध्ये सुरू आहे आणि वरुणच्या अपोजिट सारा अली खान आहे. या सिनेमाच्या शुटिंगनंतर वरुण धवन एका आर्मी ऑफिसरच्या बायोपिकमध्ये लीड रोल साकारणार आहे. परमवीर चक्र पदकाने सन्मानित सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला असणार आहे.

अरुण खेत्रपाल हे 1971 च्या युद्धामध्ये शहिद झाले होते.त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला आदरांजली म्हणूनच हा बायोपिक बनवला जात आहे. स्वतः वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहीती दिली आहे. अद्याप या सिनेमाचे शिर्षक निश्‍चित झालेले नाही.

“बदलापूर’चे डायरेक्‍शन करणाऱ्या श्रीराम राघवनवरच याही सिनेमाच्या डायरेक्‍शनची जबाबदारी असणार आहे. आपल्या सैनिकाचा रोल करायला मिळावा, अशी वरुण धवनची खूप पूर्वीपासून इच्छा होती. मात्र या सिनेमामध्ये त्याला मिलीटरी मॅनच्या ऍक्‍शनबरोबर इमोशनल टच असलेल्या व्यक्‍तीरेखेला साकारायची संधी मिळाली आहे.

हा रोल साकारल्यावर आपण प्रेक्षकांना आणि खेत्रपाल कुटुंबीयांनाही निराश करणार नाही, अशी ग्वाही देखील वरुण धवनने दिली आहे. लवकरच मिलीटरी युनिफॉर्ममधील वरुण धवन आपल्याला बघायला मिळणार हे निश्‍चित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.