बॉलिवूडमधील देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स् ही जोडी सतत चर्चेत असते. प्रियांका सतत निकसोबतचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी “द स्काई इज पिंक’च्या प्रमोशनसाठी भारतात आलेल्यानंतर प्रियांकाने निकबाबतच्या अनेक खासगी गोष्टीही शेअर केल्या होत्या. आता परिणीति चोप्रानेही निकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो तिच्या गाण्यावर डान्स करताना दिसतो.
प्रियांकासह परिणीतिलाही तिच्या जाजू निक जोन्स्बाबत कायम प्रश्न विचारले जातात. आपली मोठी बहिण प्रियांकाच्या लग्नात परिणीति खूपच गॉर्जस दिसत होती. जीजा-सालीच्या या जोडीलाही अनेकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे जेव्हा जाजू तिच्या गाण्यावर डान्स करत असेल तर परिणीति उत्साहित होणारच.
परिणीतिने निकचा हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, खरं तर निकने सिद्धार्थ पेक्षाही उत्तम डान्स केला आहे. तुम्हीही पहा, कशा प्रकारे निक जोन्स्ने पंजाबी गाण्यावर ठेका धरला आहे. दरम्यान, हे गाणे “जबरिया जोड’ या चित्रपटातील असून यात परिणीति चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्राने परफॉर्म केला होता.