पुणे – पुण्यात एकीकडे गुन्हगारी वाढत असताना, दुसरीकडे रोडसाइड रोमियो मुळे विनयभंग चे प्रकार ही वादात आहे. मात्र पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात घटना समजल्यावर बहिणीच्या नात्याला हादरा बसेल अशी धक्कादायक तक्रार दाखल झाली आहे. सख्या बहिणीनेने आपल्या लहान बहिणीशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मोठ्या बहिणीवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात एका 18 वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून 24 वर्षीय मोठ्या बहीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या बहिणीच ही उच्च शिक्षित असून तीच लग्न झालं आहे. ती तिच्या वडिलांसोबत राहते, फिर्यादी 18 वर्षीय तरूणी आणि 24 वर्षीय आरोपी ह्या दोघी सख्य बहीणी असून त्या दोघी एकत्र विमाननगर परिसरातील एका रो हाऊसमध्ये राहत.
23 जानेवारी रोजी फिर्याफी लहान बहीण ही हॉल मध्ये झोपली असताना आरोपी मोठी बहिणीने तिच्याशी अश्लिल चाळे केले. तरूणीला हा प्रकार चुकीचा वाटल्याने तिने पोलिस ठाण्यात धाव घेत मोठ्या बहिणी विरोधात फिर्याद दिली आहे.