पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या वंदेभारत वर्कशाॅप कम वर्कशॉप डेपोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आॅनलाइन पध्दतीने झाले. दरम्यान, यावेळी पाच जन औषधी केंद्रांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण येथे, डाॅ. मेधा कुलकर्णी या पुणे येथे, सांगली याठिकाणी संजय पाटील कोल्हापूर येथे धनंजय महाडिक, पिंपरीमध्ये उमा खापरे तर सातारा येथे धैर्यशील कदम तर तृप्ती बांदलकर या पाटस स्टेशनवर उपस्थित होत्या. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंू दुबे यांनी फलटण तर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह यांनी पुणे येथील कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.
या उद्घाटनामध्ये महाराष्ट्रात 150 वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलची उभारण्यात येणार. 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम, 130 सोलर पॅनेल, 18 नवीन लाईन्स/दुहेरीकरण/गेज कन्व्हर्जन, 12 गुड्स शेड, 7 ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम, 4 गती शक्ती टर्मिनल, 3 विद्युतीकरण प्रकल्प यांसह फलटण-बारामती नवीन रेल्वे लाईनचा समावेश आहे.
दरम्यान, लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) यासह नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे 4 रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
आता प्रतिक्षा वंदेभारत सुरू होण्याची…
पुण्यातील वंदेभारत मेंटेनन्स वर्कशॉप डेपोचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे पुण्यातून वंदेभारत सुरू होण्यास एकप्रकारे हिरवा कंदील मिळाला असून, आता प्रतिक्षा आहे ती पुण्यातून वंदेभारत कधी सुटणार याची. आचारसंहिता लागू होण्याअधी ही वंदेभारत सुरू होणार की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, कोल्हापूर वंदेभारत सुरू होणार हे स्पष्ट होईल.