दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २८ मे २०२३ रोजी देशाच्या नव्या संसदे भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले आहे. या इमारतीच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला. याप्रकरणी कॉँग्रेससह 19 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. परंतु भाजपच्या दिग्गज नेते मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरवात पूजा आणि होमहवनने झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेंगोलची पूजा केली. त्यानंतर संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. यानंतर संतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सेंगोलसह नवीन संसद भवनात प्रवेश केला. त्यांनी सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला वैदिक मंत्रोच्चारात स्थापित केला.
#WATCH | ‘Sarv-dharma’ prayers are underway at the new Parliament building as the inauguration ceremony is led by PM Modi pic.twitter.com/6NyADeDZoM
— ANI (@ANI) May 28, 2023
या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीयांकडुन प्रार्थना देखील करण्यात आली आहे. यावेळी हिंदू, पंजाबी, शीख, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या सर्वधर्मीयांकडुन प्रार्थना करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.