रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत या राज्यव्यापी नवीन संस्थेचा उद्घाटन समारंभ पार पडला. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व ग्राहकांना शोषणमुक्त करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे.
यानिमित्ताने निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे, शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिक्रापूरचे नितीन महाजन, शाखा अभियंता पाचुंदकर, रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, ग्राहक पंचायत पुणेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भोरडे, राज्य उपाध्यक्ष जनार्दन पांढरमिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, वनपरिक्षेत्र शिरूरचे प्रताप जगताप, सहायक निबंधक अरुण साकोरे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी अॅड. बाबुराव ढमढेरे, भगवान थोरात, पत्रकार अरुणकुमार मोटे, तेजस फडके, संदीप कुटे, वेतन भोर, अभिषेक टेंभेकर, संदीप टूले, प्रमोद लांडे, बाबासाहेब थिटे, अतुल पाचुंदकर, दत्तात्रय रवलेकर, माजी सरपंच प्रवीण आव्हाळे, अँड. गणेश तोडकर, उद्योजक विजय करपे, राहुल करपे, शिरूर, हवेली, दौड, जुजर, खेड या तालुक्यांतून मोठ्या संख्येने ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.