तिहार जेलमध्ये कैद्याच्या पोटात सापडला मोबाइल

संग्रहित छायाचित्र.....

नवी दिल्ली – देशातीलच नव्हे तर, आशिया खंडातील सर्वांत मोठे कारागृह असलेले तिहारचे कारगृह वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असते. येथे कैद्यांकडून मोबाईल जप्त होण्याचा प्रकार काही संपलेला नाही. कधी त्यांच्या साहित्यातून, कधी शौचालयातून, तर कधी कपड्यांमधून मोबाईल जप्त करण्याचे अनेक प्रकार तिहारमध्ये घडले आहेत. सगळ्यात आश्‍चर्याची बाब म्हणजे, एका कैद्याच्या पोटातून मोबाईल जप्त केल्याची घटनादेखील तिहारमध्ये घडली आहे.

तिहारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात 16 ऑगस्ट रोजी एका आधुनिक मोबाईल जप्त करण्यात आला. दुपारी एक ते तीन यावेळेत कारागृहातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ड्युटींमध्ये बदल होत असतात. त्यावेळी हा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अतिशय नाजूक आणि हलका असलेला मोबाईल कारागृहातील विपश्‍यना वॉर्डमध्ये जप्त करण्यात आला. मुळात या कारागृह चारमध्ये काही निवडक आणि हायप्रोफाईल खटल्यांमधील कैद्यांची व्यवस्था आहे. गोयल यांच्या कारागृहातील छापा पथकानेच हा मोबाईल जप्त केला आहे.

आश्‍चर्याची बाब अशी की, कैद्याच्या पोटातून मोबाईल जप्त केला जाण्याची ही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीतीलच एका दुसऱ्या कारागृहात कैद्याच्या पोटात मोबाईल सापडला होता तो जप्त करण्यात आला. कारागृहातील अधिकाऱ्यांनी एक मोबाईल जप्त केल्याची माहिती दिली होती. पण, त्या व्यक्तीच्या पोटात चार मोबाईल होते, अशीही चर्चा होती. त्याला अर्थातच अधिकृत दुजोरा मिळाल नाही.

दरम्यान, संदीप गोयल यांनी तिहारमध्ये कोणत्याही प्रकारची अराजकता नाही, सगळीकडे शांतता आहे, अशी माहिती दिली आहे. पण, तिहारच्या चार नंबरच्या कारागृहात कैद्याच्या पोटात मोबाईल सापडल्याची चर्चा आहे. ही चर्चा दिल्लीतील इतर कारागृहांपर्यंत पोहोचली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)