नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कोविडच्या सक्रिय रूग्णांची संख्या आता केवळ 1896 इतकी राहिली आहे. तथापि अत्यंत कमी प्रमाणात का होईना पण भारतात अजूनही करोनाच्या केसेस आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
या 99 प्रकरणांमुळे देशातील एकूण कोविडग्रस्तांची संख्या 4 कोटी 46 लाख 82 हजार 437 इतकी झाली आहे. तर कोविडमुळे मरण पावलेल्यांची संख्या 5 लाख 30 हजार 739 इतकी झाली आहे.गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड रूग्णांच्या संख्येत 10 ने घट झाली.