नवी दिल्ली(दि. 3) – गेल्या 24 तासात देशभरात करोनाच्या 16,103 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात 13,929 करोना रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 98.54 टक्के झाला आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,11,711 आहे.
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 197.95 कोटींचा टप्पा पार केला आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली.
आतापर्यंत 3.69 कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिलपासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.81 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.27 टक्के आहे.