मुंबई – राज्यात करोना रुग्णसंख्या काहीशी कमी होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 1005 नव्या रुग्णांची भर पडली असून चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 तासांमध्ये एकूण 1044 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकूण 11,968 इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत आहे. मुंबईमध्ये 2977 इतके सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल पुण्यामध्ये 2726 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आतापर्यंत 79,00,626 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्क्कायंवर पोहोचले आहे. राज्यातील करोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण 1.83 टक्के इतके आहे.