लोणावळा : शहरात शनिवार व रविवार पावसाची उघडझाप सुरू होती तर सोमवारी सकाळपासून तर रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे मागील 24 तासात लोणावळा शहरात सोमवारी (15 आॅगस्ट) 24 तासात 71 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आहे. लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत 4038 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजपर्यंत 3491 मिमी पाऊस झाला होता.
दरम्यान, पावसामुळे शहरातील रस्ते तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर व शोल्डर लेनवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक संथ गतीने होते. परिणामी वाहतूककोंडी देखील होते. तसेच येत्या काळात दहीहंडी व गणेशोत्सव हे सण येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा वाढणार आहे. त्यापुर्वी लोणावळा नगरपरिषद व आयआरबी कंपनी यांनी तात्काळ हे खड्डे बुजवत नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.