सातारा – जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 जणांना 10 दिवसानंतर मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. तसेच फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या करोनामुक्त झालेल्यांमध्ये कराड तालुक्यातील खुबी येथील 19 वर्षीय युवक, उंब्रज येथील 43 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 65 वर्षीय महिला, 12 वर्षांची मुलगी, 8 वर्षाचा बालक व 34 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, 56, 27 व 23 वर्षीय पुरुष, मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, तारुख येथील 56 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शितापवाडी येथील 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, काराटे येथील 49 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला, 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष व 1 वर्षाचा बालक, पिंपळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शहाजी चौक शिरवळ येथील 20 व 42 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खंडेवाडी (वारुडगड) येथील 33 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, दहिवड (रोहोट) येथील 28 वर्षीय पुरुष, आर्वे येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 28 व 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व 28 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 39 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
योद्ध्यांच्या हस्ते करोनामुक्तांना शुभेच्छा
कराड – कृष्णा हॉस्पिटलमधून मंगळवारी सहा करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कराड पालिकेतील करोना योद्ध्यांच्या हस्ते या रुग्णांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यासाठी कराड पालिकेतील युवराज भोसले, हनुमंत लादे, सुरेश शिंदे, राजाराम सपकाळ, संजय लादे, संजय भोसले या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलच्यावतीने विशेष निमंत्रित करण्यात आले होते. कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील व कर्मचारी उपस्थित होते.