पुणे : २९ फेब्रुवारी २०२० या तारखेला भारतीय विद्यापीठ जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या वतीने टेक्नोइनोव्हा २०२० ही पेपर प्रेझेन्टेशन प्रतियोगीता आयोजीत करण्यात आली. ही एक राष्ट्रस्तरीय पेपर प्रेझेन्टेशन स्पर्धा होती.
या स्पर्धेत पाच मुख्य विभाग होते. त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील आदित्य दफळ आणि तेजस पाटील या विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील कॉम्पुटर विभागात पहिले पारितोषिक जिंकले. त्यांनी तल्लखपणे ऑगमेंटेड रिऍलिटी या विषयावर एक पेपर सादर केला.
सत्यम सोमवंशी आणि शुभम थिटे यांनी यांत्रिकी विभागात द्वितीय क्रमांक मिळविला.त्यांनी अडीटिव्ह मॅन्युफॅकचरिंग 4डी प्रिंटिंग या विषयावर विशद केले. आदित्य सालके आणि रितेश यादव या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता व उत्तमरीत्या ऑगमेंटेड रिऍलिटी या विषयावर पेपर सादर केला.
स्पर्धेतील प्रमुख पाहुणे, मोहन पलेजा यांनी विजेत्यांना ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन गौरविले. यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.यु.एन.कांबळे, प्रा.आर.वाय.भोंडे आणि प्रा.एम.दातीर हे त्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दिवे होते.प्राचार्य, व्ही.आर.राव यांनी विजेत्यांचे कौतुक केले. त्यांच्या कॉलेजमध्ये असे हुशार विद्यार्थी असल्याचा कॉलेजला अभिमान आहे.
– श्रेया अंबेटी,
कॉलेज रिपोर्टर,
कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी