तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने येत्या शनिवारी (दि. २) कै. कल्याणराव ऊर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक राष्ट्रोत्सव’ या विषयावर ते बोलणार आहेत.
दरम्यान, सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या ओंकार विजय डोके (कनिष्ठ अभियंता पी.डब्लु.डी), सचिन लोखंडे (वरिष्ठ सहाय्यक लेखापाल जिल्हा परिषद कोल्हापूर) व प्रणव भेगडे (सी. डी. एस.) यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे.
अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनील शेळके असणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूना पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी करके, अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
…..