पुणे – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत आजपर्यंत करोनाचे 5 लाख 38 हजार 949 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 8 हजार 37 इतकी आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण 3 लाख 62 हजार 219 रुग्णांपैकी 3 लाख 47 हजार 286 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 6 हजार 217 आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.88 टक्के आहे.
सातारा जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण 54 हजार 234 रुग्णांपैकी 51 हजार 802 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 676 आहे. सोलापूर जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण 49 हजार 62 रुग्णांपैकी 46 हजार 453 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 887 आहे.
सांगली जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण 47 हजार 581 रुग्णांपैकी 45 हजार 658 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 191 आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण 49 हजार 519 रुग्णांपैकी 47 हजार 750 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.