प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “द व्हाईट टायगर’या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर बघितल्यानंतर प्रियांकाचे सासरे पॉल केविन जोनास हे खुपच इम्प्रेस झाले आहेत. प्रियांकाने हा ट्रेलर इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. त्याच्या कॉमेंटबॉक्समध्ये सासरे पॉल जोनास यांनी कॉमेंट केले आहे.
“ट्रेलर बघितल्यानंतर सिनेमा बघण्यासाठी मी खूप उत्सुक झालो आहे. मला माझ्या सुनेचा अभिमान वाटतो आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे. प्रियांकाच्या सिनेमाचा ट्रेलर आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे आणि त्यावर कॉमेंटही केल्या आहेत.
यामध्ये सोनाली बेंद्रे, पत्रलेखा, रेबेल विल्सन, सेलीना जेटली, मौनी माथूर आणि मानवी कागरू यांच्याही कॉमेंट आहेत.
सोनाली बेंद्रेने टाळ्या वाजवणाऱ्या इमोजी पोस्ट केलेल्या आहेत. रहीम बहुरानीच्या डायरेक्शन खाली “द व्हाईट टायगर’ मध्ये प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्या व्यतिरिक्त आदर्श गौरव लीड रोलमध्ये असेल. “द व्हाईट टायगर’ याच नावाच्या अरविंद आदिगा यांनी लिहिलेल्या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला आहे.