भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नसोहळ्याची होणार चौकशी

पुणे – माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयरल झाले होते. याची दखल घेत सातपुतेंच्या लग्न सोहळ्यात नियमांचे पालन झाले, की नाही याची चौकशी करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना दिले आहेत.

या लग्नसमारंभात राज्यभरातील नागरिकांसह नेते मंडळींनी सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. समाजमाध्यमांत प्रतिक्रियांमध्ये “सर्वसामान्यांना दंड मग राजकीय नेत्यांकडे दुर्लक्ष का?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती शिसवे यांनी दिली आहे.

लग्नसोहळ्यासाठी 50 नागरिकांना येण्याची परवानगी आहे. मात्र, सातपुतेंच्या लग्नात अधिक नागरिकांची उपस्थित असल्याचे व्हिडिओ आले होते.

यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, नीतेश राणे यांनी हजेरी लावली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.