सलमान खान आणि आयुष शर्मा हे सध्या “अंतिम – द फायनल ट्रुथ’च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. यामध्ये आयुष शर्मा एका गॅंगस्टारच्या रोलमध्ये दिसणार आहे. सलमानने या सिनेमातला आपला फर्स्ट लूक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान आणि आयुष यांच्यातील फाईट सीन बघताना अंगावर काटा उभा रहातो.
या सिनेमात सलमान एका शीख युवकाच्या भूमिकेत आहे. नेहमीप्रमाणेच सलमानचा हा सिनेमा देखील ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. “अंतिम’साठी आयुष शर्माने स्वतः मध्ये खूप बदल केला आहे. कसून व्यायाम करून तो सलमानच्या तोडीसतोड तगडा दिसतो आहे. त्याने सिक्स पॅक्ड बॉडी बनवली आहे आणि सलमानच्या स्टाईलनेच तो देखील बॉडी दाखवतो आहे.
नेहमीप्रमाणे सलमानही विना शर्टचा लुक देऊन आपली बॉडी दाखवतो आहे. सलमानने यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये विनाशर्टचा लुक दिलेला आहे. मात्र यावेळी त्याच्या सिक्स पॅक्ड बॉडीचे फॅन्सनी कौतुक केले आहे. “अंतिम’ हा ऍक्शन ओरिएंटेड सिनेमा असणार आहे अणि त्याच्यातील ऍक्शन सीनही खूप भन्नाट असणार आहेत.