जवळार्जुन, (वार्ताहर) – कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी नगरीत जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जेजुरीच्या विविध 14 ठिकाणी आरोग्य विभाग सेवक अधिकार्यांनी रविवारी (दि. 3) दिवसभरात 2584 हजार बालकांना 14 बूथकेंद्र, 1 मोबाइल टीम, 4 ट्रानझेटच्या माध्यमातून पोलिओ डोस देण्यात आला.
आरोग्यसेवक अनिल शिंदे यांनी आयोजन केलेल्या जेजुरी एसटी बस स्थानकावर या पोलिओ मोहिमेचा प्रारंभ वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप साळवी, मनोहर सोनवणे, जेजुरी पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, भाजपा कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे यांच्या उपस्थित झाला. प्रवासी चिमुरड्या मुलांना खाऊ वाटप करीत सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिओ डोस देण्याची प्रक्रिया सुरू होती.