मंचर -घोडेगाव (ता. आंबेगाव) शहरात मास्क न घालणाऱ्या 64 जणांकडून मंगळवारी (दि. 7) दुपारपर्यंत प्रत्येकी 500 प्रमाणे 32 हजारांचा दंड पोलीस, ग्रामपंचायतीच्या वतीने वसूल करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घोडेगाव येथील प्रशासन अलर्ट झाले आहे. येथील विविध दुकानांत विविध वस्तू खरेदीसाठी सुमारे 40 गावांचा दैनंदिन संबंध येतो.
शहरातील काही नागरिक किंवा बाहेर गावाहून आलेले नागरिक मास्क किंवा रुमाल तोंडाला न लावता राजरोसपणे फिरत आहेत, त्यामुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून सरपंच क्रांती गाढवे, सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.