अवसरी – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सतीश चंद्रकांत फुलसुंदर (वय 35) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
ही बातमी समजताच विद्या विकास मंदिर शाळेतील 2001 च्या दहावीच्या वर्गातील सतीशच्या वर्गमित्रांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सतीशच्या कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले.
काही दिवसांत या सर्व मित्रांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जमा केली. ही रक्कम फुलसुंदर यांच्या नावे पोस्टात दीर्घ मुदतीच्या ठेवीमध्ये गुंतवण्यात आली आहे.