काऊंसिलर ते अभिनेत्री शुभ्राची व्यक्तिरेखा साकारताना झी मराठीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. आता त्या जागी ‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका सुरु होणार आहे.
View this post on Instagram
अग्गबाई सूनबाई या मालिकेत ‘शुभ्रा’ च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा तर काहींसाठी नवखा वाटणारा उमा पेंढारकर हा चेहेरा दिसणार आहे. मुळात एक काऊंसिलर असलेल्या उमाचा अग्गबाई सूनबाई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.
View this post on Instagram
जेव्हा झी मराठीकडून या मालिकेची ऑफर आली तेव्हा मलाही असाच प्रश्न पडला होता, तेजश्री खूप सिनियर आणि मोठी अभिनेत्री आहे, पण मी ह्या मालिकेत रिप्लेसमेंट म्हणून आलेली नाही, ह्या शुभ्राचं रूप तिच्यापेक्षा खूप वेगळं आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हा दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, ही शुभ्रा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.
View this post on Instagram
काऊंसिलर ते अभिनेत्री – डोंबिवलीकर उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. अद्वैत दादरकारचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती पहिली आली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार मिळाला. आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं. याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काउंसिलिंग चं काम मोठया जबाबदारीनं करते.
तसं पाहिलं तर अग्गबाई सासूबाईचीच संपूर्ण टीम या मालिकेत आहे, केवळ मी आणि अद्वैत दादरकर वगळता इतर बरेचजण तेच आहेत. त्यामुळे त्यांची एक भट्टी जमली आहे. यात आपण सहभागी होऊ शकू का? असा प्रश्न सुरवातीला पडला होत, पण पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांनी आपलेपणा दाखवला नवखेपण कुठे जाणवलंच नाही. निवेदिता ताई असोत गिरीश ओक असोत किंवा मोहन जोशी सर, हे सर्वजण इतके मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मज्जा येत आहे. पहिल्यांदाच झी मराठीसारख्या ग्लॅमरस वाहिनीसोबत काम करण्याचा अनुभव घेत असल्याने मनात एक वेगळाच आनंद आहे. पाहायला विसरू नका ‘अग्गबाई सूनबाई’ १५ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.