बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपची अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा आहे. या दोघांच्या रिलेशनबाबत सातत्याने काही ना काही गोष्टी समोर येत असतात.
तसेच सोशल मीडियावर देखील कतरिना-विक्कीचे लव अफेअर चांगलेच चर्चेत आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या दोघांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही. परंतु, आता या दोघांच्या नात्याबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.
विक्की आणि कतरिनाचा मित्र हर्षवर्धन कपूरने या दोघांच्या नात्यावरील पडदा उठवला आहे. सेलिब्रिटी चॅट शो दरम्यान हर्षवर्धनने एका प्रश्नाचे उत्तर देताना याबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले. “इंडस्ट्रीमधील कोणते रिलेशनशिप रुमर खरे मानता? असा प्रश्न हर्षवर्धन याला विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “विक्की आणि कतरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे. यानंतर तो म्हणाला की, हे सांगून मी समस्या तर ओढावून नाही घेतली ना?” दरम्यान, विक्कीच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली होती.
विक्कीचा जुना फोटो शेअर करत तिने लिहिले होते, “हॅप्पीएस्ट बर्थडे विक्की कौशल. तू असाच हसत राहा.” त्यानंतर एप्रिल महिन्यात विक्की आणि कतरिनाला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांनीही करोनावर यशस्वीपणे मात केली.