न्यूयॉर्क – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी तिसरा विवाह केला आहे. त्यांनी आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या मिर्झा बिलाल या कॉर्पोरेट जगतातील व्यक्तीशी निकाह केला आहे. बिलाल 36 वर्षांचे असून रेहम 49 वर्षांच्या आहेत. अमेरिकेत एका साध्या समारोहात त्यांचा निकाह झाला.
बिलालचे कुटुंब पाकिस्तानी वंशाचे आहे. रेहम या इम्रान खान यांच्या दुसऱ्या पत्नी असून त्यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला आहे. रेहम पत्रकार आणि कॉमेंटटेटर आहेत व 2006 मध्ये त्यांनी एका टीव्ही शोचे होस्ट म्हणून काम सुरू केले आणि नंतर 2008 मध्ये त्या बीबीसी न्यूजमध्ये रूजू झाल्या होत्या. 1993 मध्ये एजाझ रहमान यांच्याशी त्यांचा पहिला विवाह झाला होता व 2005 मध्ये ते विभक्त झाले.
नंतर त्या 2014 मध्ये इम्रान यांच्याशी विवाहबध्द झाल्या मात्र एकाच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर रेहम यांनी इम्रान यांचे खासगी आयुष्य आणि राजकीय जिवनाच्या संदर्भात अनेक वादग्रस्त विधाने केली होती. इम्रान अत्यंत घमेंडी आणि स्वत:ची प्रशंसा प्रिय असणारे व्यक्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते.