फरीदाबाद – राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने हरियाणा टप्प्याच्या शेवटच्या दिवशी फरीदाबादमध्ये प्रवेश केला, उद्या शनिवारी ही यात्रा दिल्लीत प्रवेश करणार आहे. फरिदाबादमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गुरुग्राममधील सोहना येथील खेरली लाला येथून शुक्रवारी सकाळी यात्रा पुन्हा सुरू झाली.
ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि भूपिंदरसिंग हुडा यांच्यासमवेत येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना, कॉंग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल म्हणाले की, शनिवारी दिल्लीत यात्रेच्या प्रवेशाचा मार्ग आराखडा निश्चीत करण्यात आला आहे. ही यात्रा बदरपूर मेट्रो स्टेशनजवळील बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल होईल. दिल्लीत यात्रेचा मार्ग मोठा आहे. ती लालकिल्ल्यावर थांबणार आहे.
लाल किल्ल्यावरून, काही यात्री आणि राहुलजी यांच्या समवेत कारने राजघाट आणि शांती स्थळाला भेट देतील आणि पुष्पहार अर्पण करतील. छोट्याशा विश्रांतीनंतर यात्रा 3 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातून पुन्हा सुरू होईल, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात हरियाणा आणि त्यानंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीरला जाईल.
ही भारताची यात्रा असल्याने यात्रेसाठी वाटेतील कोणत्याही राज्यात त्यासाठी वेगळी परवानगी मागण्यात येत नाही. आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, त्यांनीही आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा गोहील यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगीत करण्याची सुचना राहुल गांधींना केली आहे. परंतु कॉंग्रेसने ही सूचना धुडकाऊन लावली आहे.
उत्तर प्रदेशची सानिया मिर्झा देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट!
सविस्तर वृत्त – https://t.co/0lzaxx0BxA#sania_mirza #indianairforce pic.twitter.com/Qgefq01WZC
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 23, 2022