इम्रान खान यांनी भिक मागायला सुरूवात करावी – विश्‍वास

नवी दिल्ली – काश्‍मीरला विशेष तरतूद देणारे कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने भारताविरोधात आक्षेपार्ह विधाने करत आहेत. अशातच त्यांनी भारत काश्‍मीरमधील नागरीकांवरील अन्याय थांबवत नाही तो पर्यंत त्यांच्याशी चर्चा करणार नाही असे ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटनंतर आपचे माजी सदस्य आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी इम्रान खान यांना कटोरा उचला व जगभरात भीक मागा असा सल्ला दिला आहे.

भारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यामुळे सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थीती फारच बिकट झाली आहे. अगदी रोजच्या वापरातील दूध, भाज्या, अन्नधान्य यांचे भाव पाकिस्तानात गगनाला भिडले आहेत. तसेच सातत्याने सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे जगभरातून पाकिस्तानचा निषेध केला जात आहे.

परिणामी पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीला आता खिळ बसली आहे. अशा बिकट परिस्थीतीतही पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासारख्या सक्षम देशाला आव्हात देत असल्यामुळे कुमार विश्वास यांनी पाकिस्तानला भिक मागून उदरनिर्वाह करण्याचा सल्ला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)